सोशल मीडियावर तापले निवडणुकीचे रणांगण

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूक तारीख जाहीर केल्यानंतर फेसबुक, व्हाटसअ‍ॅप या सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम तापू लागले आहे. सर्वांची करमणूक आसली तरी यामध्ये निवडणूक जवळ येईपर्यंत अ‍ॅडमिनचे धक-धक तेवढेच वाढु लागले आहे. सोशल मिडीयावर आचारसंहिता नसली तरी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारी करू लागला आहे. सोशल मिडियावर प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधी, विरोधक, इच्छुक उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करायला सुरू केले आहे. एखादया गटाचा निष्ठावंताने दुसर्‍या गटात प्रवेश केला. त्याला मोठा धक्का. या मतदार संघाचा भावी खासदार कोण असेल, याचा एक्झीट पोल घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो. यामध्ये ज्या गटाचा कार्यकर्ते हा एक्झीट पोल घेतो. त्या गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला पसंती देतात त्यामुळे हा एक्झीट पोल देखील बोलाचीच कढी बोलाचाच भात ठरू लागली आहे.

निवडणूक जशी जवळ येथील तसे तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे महत्व देखील वाढु लागले आहे. नेते व नेत्यांची मुले, नातेवाईक, युवानेते वाढदिवस, क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावीत आहेत.त्यामुळे गावात कार्यकर्त्यांच्या मागे किती लोक जमा आहेत, प्रत्यक्षात निवडणुकीत कितीजण राहणार हा चितंनाचा विषय तरी देखील या सर्व कार्यक्रमाचा फार्स सोशल मीडियावर आहे. या निवडणूका डोळयासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीची समाज उपयोगी कामे देखील मोठया प्रमाणात होत असल्याचे सोशल मीडियावर अनेक ग्रुपवर पहायला मिळत आहे. प्रत्येक गट पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या कार्याचा किंवा समारंभाची माहिती सोशल मीडियावर टाकतो त्याला समर्थक उत्तर देणारी पोल विरोधी गटाचा कार्यकर्ता टाकत असतो. त्यामुळे निवडणुकीपुर्वीच सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र रणांगण तापत असल्याचे दिसत आहे. निवडणूकीचा निकाल फिरवणे तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे या सोशल मीडियावर होणारी चर्चादेखील निवडणुकीत कलाटणी देणारी ठरू लागली आहे.

Exit mobile version