रास्तभाव धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी सोमवारी (दि.4) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच तळा तहसीलदार एम. कनशेट्टी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेद्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत 440 रुपये प्रतिक्विंटल कमिशन देण्यात यावे. फक्त गहू-तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्यपदार्थांवर एक किलो प्रति क्विंटल हॅन्डलींग लॉस देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गहू तांदूळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळी दरमहा देण्यात याव्यात. एलपीजी गॅसचे संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात कंपनीच्या वितरकांकडून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकान अंतर्गत रेशन कार्डवर असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्यावर निश्‍चित कमीशन ठरविण्यात यावे. तांदूळ गव्हाच्या गोण्या भरताना ज्यूटच्या बारदानामध्ये भरून देण्याबाबत व प्लास्टिकच्या गोण्या बंद करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढून भारतीय खाद्य निगमला निर्देशित करावे. करोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारक यांच्या कुटुंबाला ठराविक स्वरूपात मदत देशपातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे. केंद्र सरकारने वाढवलेले 20 रुपये व 37 रुपये कमिशनची रक्कम सर्व राज्य सरकारने तात्काळ अमलात आणावी. पश्‍चिम बंगालच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून सर्वांसाठी अन्न या योजनेअंतर्गत सर्व कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची योजना आखण्यात यावी. पूर्ण देशभरात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्रोक्रुमेंट एजंट म्हणजेच सरकारद्वारा गहू तांदूळ भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी. यांसारख्या मागण्यांसाठी तळा तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांकडून तळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

Exit mobile version