रायगड प्रिमियर लीगमध्ये महिला खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ

। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील होतकरु महिला खेळाडुंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी,या हेतुने रायगड प्रिमियर लिग आयोजन समिती तर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले.

बेलापूर येथील सिडकोच्या भव्य मैदानावर हे दोन्ही सराव सामने खेळविण्यात आले. सामन्यांसाठी पालकवर्ग आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिल्याने खेळाडुंच्या उत्साहात भर पडली होती. मुंबई आणि नवी मुंबईतील नवोदित उभरत्या आणि नामांकित महिला तरुण खेळाडुंचा भरणा असलेल्या संघांमध्ये होता आणि प्रत्येक संघाने एक एक सामना जिंकला. रायगड प्रिमियर लिग तर्फे उपल्ब्ध असलेल्या खेळाडु मधुन दोन संघ तयार करण्यात आले होते. या सामन्यांतून रायगडच्या खेळाडुंना मिळालेला अनुभवाचा फायदा पुढील कारकीर्द घडविण्यासाठी महत्वाचे होते. महिला प्रिमियर लिगची घोषणा करण्यात आल्या नंतर आयोजकांतर्फे महिलांचे संघ बांधणीकरीता राबविलेल्या विविध उपक्रमांचा परिणाम या सामन्यांमध्ये पहायला मिळाला. रायगडच्या लहान, छोट्या खेळाडुंचा मैदानावरील आत्मविश्‍वास वाखाणण्याजोगा होता. समोर आलेला पावसाळा आणि प्रिमियर लिग आयोजकांतर्फे करण्यात येणारे आणखी काही सामने, खेळातील आणखी बारकावे शिकणे आवश्यक असल्याने तुर्तास रायगड प्रिमियर लिग स्पर्धा काही कालावधीनंतर आयोजित करण्याचा बेत आयोजन समितीतर्फे व्यक्त करण्यात आला.

या सामन्यांच्या वेळी चेतन त्रिवेदी यांनी रायगड प्रिमियर लिगतर्फे जिल्ह्यातील महिला क्रिकेटसाठी करण्यात येणार्‍या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले आणि नियोजित स्पर्धेला जास्तीत जास्त मदत करण्याचे जाहीर केले. हे दोन्ही सामने आयोजीत करण्याकरिता अध्यक्ष राजेश पाटील, जयंत नाईक, कौस्तुभ जोशी, प्रदीप खलाटे, सुरेन्द्र भातिकरे, संदीप जोशी, प्रितम पाटील, हुसेन तांबोळी यांचे विशेष प्रयत्न होते.

Exit mobile version