चांगभले मंदिराचा भंडारा उत्साहात

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ माथेरान घाट रस्त्यात माथेरान शहराची वेस असलेल्या ठिकाणी चांगभलं मंदिर आहे. या मंदिरातील चांगभल देवाला माथेरानवर येणारे संकट वेशीवर रोखणारा देव समजले जाते. तसेच, नेरळ-माथेरान असा अवघड घाटातील प्रवास टॅक्सी सेवेच्या माध्यमातून देणार्‍या टॅक्सी चालकांवर कोणतेही संकट आणू देत नाही. अशी श्रद्धा असल्याने नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेच्यावतीने डिसेंबर महिन्यात चांगभलं मंदिरात वार्षिक भंडारा आयोजित केला जातो. या वार्षिक भंडार्‍यासाठी दस्तुरी येथील कुली संघटना, मुलवासी अश्‍वपाल संघटना आणि लॉजिंग संघटना यांचे सहकार्य मिळाले.

माथेरान घाटरस्त्यात असलेल्या श्री चांगभलं मंदिर येथे नेरळ माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्था तसेच दसुरी नाक्यावरील कुली संघटना, अश्‍व पाल संघटना व लॉजिग संघटना यांच्या माध्यमातून भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 20 वर्षांपासून नेरळ माथेरान टॅक्सी संघटना हा भंडारा सोहळा साजरा करीत आहे. यावेळी श्री पिसनाथ महाराज चांगभलं मंदिर फुलांनी सजवून मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात विधीवत पुजा-अर्चा, होमहवन रूद्राभिषेक, करण्यात आला.

Exit mobile version