भराडी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला म्हणजेच प्रसिद्ध अशा आंगणेवाडीच्या यात्रेला आज (दि.9) पासून सुरुवात झाली आहे. दीड दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक आंगणेवाडीत हजर झाले असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबचलांब रांगा लावल्या आहेत. यात्रेत धार्मिक महत्त्वासोबतच सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात तसेच दशावतारही असतो.






