आगीच्या ज्वाळांनी पक्षुपक्षी होरपळले

उरण वनविभागचा डोळेझाक कारभार
| उरण | वार्ताहर |
उरण वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळेझाक कारभारामुळे तालुक्यातील डोंगराळ परिसरात आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस होत आहे, असा आरोप उरणकरांकडून करण्यात येत आहे. या आगीत पक्षुपक्षी होरपळून मृत्युमुखी पडत आहेत.वन विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल जनमानसात संतापाची लाट उसळत आहे.

वनांचे (डोंगर परिसराचा) व तेथील पक्षुपक्षी, वन्यप्राणी यांचे संरक्षण व जतन करण्याचे काम वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे आहे. मात्र, उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत असल्याने ठेकेदार यांची आर्थिक हितसंबंध जोपासत पाठराखण करण्याचे काम हे उरण तालुका वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे सातत्याने करीत असून, त्यामुळे डोंगर परिसराचा र्‍हास झपाट्याने होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी उरण तालुक्यातील आगीच्या घटनांची दखल घेण्यासाठी जातीने केंद्रित करावे, अशी मागणी पक्षीप्रेमी करीत आहेत.

Exit mobile version