। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील धोबी आळी आझाद बेकरीच्या बाजूला असलेल्या विहिरीत दुर्गेश शरद तळेकर या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 14) उघडकीस आली. वाणी आळ, धोबी आळीजवळील आझाद बेकरीच्या बाजूला असलेल्या विहिरीत दुर्गेश तळेकर यांचा मृतदेह पनवेल शहर पोलिसांना सापडला. दुर्गेशचा मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नसून याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







