। माणगाव । प्रतिनिधी ।
अभिषेक दत्तु राऊत (40) मूळ रा. कळमजे, सध्या रा. विलेपार्ले मुंबई याचा मृतदेह माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत गावाच्या डोंगराजवळ सडलेल्या स्थितीत सापडल्याने एकच खळबळ गारळ गावात उडाली.याबाबतची खबर दत्तु विठोबा राऊत, मूळ रा. कळमजे, ता. माणगाव सध्या रा. विलेपार्ले, मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अभिषेय याला दारूचे व्यसन होते, तो दि. 6 मेपासून बेपत्ता होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. खिरिट हे करीत आहेत.