| मुरुड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध काशीद समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही या पर्यटक सापडला नाही. मुरुड पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ही शोधकार्य सुरू ठेवले होते. आज सोमवार दि. 19 सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या पर्यटकाचा मृतदेह सापडला.
मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे काशीद बीच येथे रविवारी (दि.18) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोमनाथ भोसले मूळ राहणार शिर्डी सध्या रा. हडपसर काळेवाडी हा तरुण त्याच्या मित्र- मैत्रिणी सोबत श्रीनिधी कंपनी हडपसर पुणे असे फिरायला आले होते त्यातील वरील सोमनाथ भोसलेहा तरुण हरवलेला होता. सदर तरुण मिळून न आल्याने मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गदमले, पोलीस हवालदार दसाडे, पोलीस शिपाई बारवे लाईफ गार्ड व सागर रक्षक दल यांच्या मदतीने शोध घेतला असता चार वाजता सोमनाथ भोसले याचा मृतदेह काशीद बीच येथे सापडला असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
काशीद समुद्रकिनारी बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला
