| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा मच्छी बाजाराजवळील मोहोपाडा बसथांब्यात एका 49 वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुन्ना छोटुमिया शेख (सध्या रा. तुपगाव, मूळ -जे.जे.कॉलनी, बांद्रा मुंबई) यास दारु पिण्याचे व्यसन असून, तो मोहोपाडा बसस्टॉपमध्ये मृत अवस्थेत पडलेला होता. याबाबत त्याचा मुलगा चांद मुन्ना शेख (19) याने पोलिसांना माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून मुन्ना शेख याचा मृतदेह चौक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत तपासिक अंमलदार सतीश नलावडे पुढील तपास करीत आहेत.