कचरा डेपोत सापडला मृतदेह

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या कचरा डेपो समोरील जागेत 31 वर्षाच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. योगेश बत्तासे असे मृत तरुणाचे नाव असून तो नांदगाव येथील असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौळाणेजवळ असलेल्या कचरा डेपो समोरील जागेत योगेश बत्तासे या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. योगेश बत्तासे हा नांदगाव येथील रहिवासी असून त्याची नांदगाव पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास चालू आहे.

Exit mobile version