| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील कोळवाडा वडघर खाडी किनारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 50 वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फुट, चेहरा गोल, अंगाने मध्यम, डोक्याचे व दाढीचे केस काळे पांढरे व वाढलेले, कपाळ मोठे, नाक सरळ, दोन्ही हातामध्ये जर्मन व पितळेचे मनगट कडे असून अंगात राखाडी व हिरव्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तसेच दोन पायामध्ये जांभळ्या रंगाच्या प्लॅस्टीकच्या चपला घातलेल्या आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (27452333) किंवा पो.उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे (9823047161) येथे संपर्क साधावा.