। सोलापूर । वृत्तसंस्था ।
सोलापुरातील बार्शीमधे पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर मुलाने पळ काढला असून पोलिसांनी त्याची संशयित आरोपी म्हणून नोंद केली आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून गुन्ह्यातील फरार आरोपी श्रीराम फावडे (21) याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.







