| रायगड | प्रतिनिधी |
कर्जत येथील जागेच्या 10 दस्तांच्या साक्षांकित प्रती काढून देण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मोहन गायकवाडला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवीमुंबई यांनी रंगेहाथ अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील जागेच्या 10 दस्तांची साक्षांकित प्रती काढून देण्यासाठी मनोज गायकवाड याने तक्रारदाराकडून 7 हजार रुपये मागितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. तक्रादाराबरोबर बोलणी झाल्याप्रमाणे मोहन गायकवाड याने 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार, रतन गायकवाड, संतोष तम्हाणेकर, उमा बासरे, पोलीस नाईक योगेश नाईक, पोलीस शिपाई सचिन माने आणि निखिल चौलकर यांनी सापाला रचला होता.