भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; 16 संघांचे गटवारी जाहीर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑगस्टमध्ये हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि.17) मार्च रोजी स्पर्धासाठी गटवारी जाहीर झाली आहे. ही गटवारी जाहीर झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्याच फेरीत आमने-सामने येणार हे निश्चित झाले आहे.
भारतीय संघाचा समावेश पाकिस्तानसह ड गटात केला आहे. या गटात इंग्लंड आणि वेल्स या संघांचाही समावेश आहे. या गटातील सामने नेदरलँड्समध्ये खेळवले जाणार आहेत. दरम्यान, महिलांचाही हॉकी वर्ल्ड कप होणार असून भारतीय महिला संघाने काही दिवसांपूर्वीच पात्रता मिळवली आहे. त्यांचाही समावेश डी गटात झाला असून या गटात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत. तथापि, अद्याप वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही..भारतीय संघ 2016 पासून पाकिस्तानविरुद्ध हॉकीमध्ये पराभूत झालेला नाही. भारतीय हॉकी संघाने गेल्या 10 वर्षात पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व ठेवले आहे. हे दोन हॉकी संघ यापूर्वी शेवटचे 2024 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमने सामने आले होते. त्यानंतर 2025 च्या आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही संघ आमने-सामने येणार होते, सुरक्षेच्या कारणाने पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला होता. आता आमने-सामने असतील.







