| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथे बसने स्कुटीला पाठीमागून धडक दिल्याने यात स्कुटीवरील मुलाच्या अंगावरून चाक जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बसचालक शिव कैलास रामेश्वर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर 12, खारघर येथील हॉटेल व्यावसायिक राहुल ओम प्रकाश मिश्रा हे त्यांची स्कुटी (एमएच 46 एम 8172) वरून रिशवराज जीवेश झा (रा. अरिहंत अरहम सोसायटी, कोप्रोली) याला घेऊन पनवेल माथेरान रोडने सुकापुर कडे जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणारी बस (एमएच 46 बीबी 4330) वरील चालक शिव कैलास रामेश्वर यादव (रा. तळोजा एमआयडीसी फेस टू) याने त्याच्या ताब्यातील बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवली. 6 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास या बसने नवीन पनवेल फूड कोर्ट हॉटेल समोरील सेक्टर 11 येथे स्कुटीला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात रिषवराज जीवेश झा (वय 19) स्कुटीवरून खाली पडला आणि त्याच्या अंगावरून चाक गेले. यात तो जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.