अरे बापरे! इतकं करुनही रायगड जिल्ह्यातील बंडखोरांना ठेंगा…

संभाव्य मंत्रिमंडळात रायगडचे एकही नाव नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लांबणीवर पडलेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या या संभाव्य यादीत रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराचे नाव नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव करून शिंदे गटात सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील तिन्ही बंडखोर आमदारांच्या हाती धतुरा आला असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपासोबत नव्याने सरकार स्थापन केले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाही. त्यामुळे सर्वत्र शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी (दि.9) सकाळी 11 वाजता होणार आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या संभाव्य यादीत रायगडमधील तिन्ही आमदारांपैकी एकाचेही नाव नाही.

बंडखोरी करणार्‍या पहिल्या यादीतही तिन्ही आमदारांची नावे झळकली होती. पण मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत त्या आमदारांची नाव नसल्याने रायगडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्टपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहितीसमोर येत आहे. दरम्यान, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्यासंबंधीत निरोप देण्यात येणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमडळातील संभाव्य यादी
भाजप संभाव्य मंत्री
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
प्रविण दरेकर
जयकुमार रावल
रविंद्र चव्हाण
नितेश राणे

शिंदे गटातील संभाव्य मंत्री
दिपक केसरकर
दादा भुसे
अब्दुल सत्तार
संजय शिरसाठ
गुलाबराव पाटील
शंभुराज देसाई
संदिपान भुमरे

Exit mobile version