भारतीय फुटबॉल संघाचे शिबीर भुवनेश्वरमध्ये रंगणार

फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीची तयारी

| भुवनेश्वर | वृत्‍तसंस्था |

भारतीय फुटबॉल संघ 2026 मध्ये होत असलेल्या फिफा विश्वकरंडकात पात्र ठरण्यासाठी सज्ज होत आहे. आगामी जून महिन्यात पात्रता फेरीच्या लढतींमध्ये कुवेत व कतार या दोन देशांविरुद्ध भारत लढणार आहे. त्याआधी भारतीय फुटबॉल संघासाठी सराव शिबिराचे आयोजन भुवनेश्वर येथे करण्यात आले आहे. 10 मे रोजी सुरू होत असलेले हे शिबिर चार आठवडे सुरू राहणार आहे.

अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली की, भुवनेश्वरमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चार आठवडे हे शिबिर रंगणार आहे. येत्या 2 जून रोजी कुवेतविरुद्धच्या लढतीसाठी भारताचा अंतिम संघ निवडला जाणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. साखळी फेरीतील सहा लढतींनंतर गटातील दोन अव्वल संघ पुढल्या फेरीत पोहोचणार आहेत. चारही देशांच्या प्रत्येकी दोन लढती बाकी आहेत.

पात्रता फेरीची गुणतालिका (अ गट)

1) कतार – 4 सामने, 4 विजय, 12 गुण
2) भारत – 4 सामने, 1 विजय, 1 ड्रॉ, 2 पराभव, 4 गुण
3) अफगाणिस्तान – 4 सामने, 1 विजय, 1 ड्रॉ, 2 पराभव, 4 गुण
4) कुवेत – 4 सामने, 1 विजय, 3 पराभव, 3 गुण

भारताच्या उर्वरित लढती

6 जून – कुवेत (कोलकाता स्टेडियम)
11 जून – कतार (अल रय्यान)

Exit mobile version