चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

12 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती

| अलिबाग । प्रतिनिधी ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात 33 उमेदवार रिंगणात आहेत. अखेर शनिवारी सायंकाळी चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा तोफा थंडावल्या असून, सोमवारी (दि.13) दोन हजार 566 मतदान केंद्रात सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. 25 लाख 85 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुमारे 12 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह 33 उमेदवारांची लढत होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रचारसभा रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केली आहे.

मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन तसेच पुण्यामधील मावळ, चिंचवड, पिंपरी या तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात 25 लाख 85 हजार 18 मतदार आहेत. त्यामध्ये 13 लाख 49 हजार 184 पुरुष व 12 लाख 35 हजार 661 महिला मतदार आणि 173 तृतीय पंथी मतदार आहेत. दोन हजार 566 मतदान केंद्रांवर 11 हजार 368 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

Exit mobile version