माथेरान घाटात गाडीने घेतला पेट

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नेरळ घाटात शनिवारी  खाजगी कारला आग लागली. त्यात ती पूर्णपणे नष्ट झाली असून नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षभरातील माथेरान नेरळ घाटातील तिसरी घटना आहे.

सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटात पर्यटनासाठी आलेली पर्यटाकांची गाडीने पेट घेतला. घाटरस्ता असल्याने कार मधील वातानुकुलीत यंत्रणा बंद करायची असते. मात्र संबंधित कार चालकाने त्याबाबत दक्षता घेतली नाही आणि त्यामुळे घाटात ही चढावावर असताना गाडीच्या बॉनेट मधून धूर यायला लागला. त्यामुळे त्यावेळी प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी पर्यटक यांनी गाडी मधून खाली येत आपले जीव वाचवले.  

सध्या उन्हळ्याचे दिवस असून माथेरानसाठी येणारी पर्यटक प्रवासी यांनी आपल्या वाहनांमधील वातानुकुलीत यंत्रणा सुरु ठेवून प्रवास करू नये. त्याचवेळी शक्य असल्याने घाटातून प्रवास करताना काही मिनिटे थांबून पुढे प्रवास सुरु करावा. म्हणजे गाडीच्या इंजिन वर लोड येणार नाही. असे पोलीस निरीक्षक तेंडुलकर यानी सांगितले.

Exit mobile version