चिकणी पूलाला झाडाझुडपांचा विळखा

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

| कोर्लई | वार्ताहर |

अलिबाग-मुरुड रस्त्यावर चिकणी निवाराशेडलगत असलेल्या पूलाला झाडाझुडपांचा विळखा असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून झाडे झुडपे तोडण्याची मागणी जोर धरीत आहे. सन 2017 मध्ये पावसाळ्यात यापूलावरुन पाणी गेल्याने धोका निर्माण झाला होता. त्यावेळी या पूलावरुन काही काळ एकेरी वाहतूक होत होती, तर अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. आता याठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. या पूलाला असलेला झाडाझुडपांचा विळखा अद्याप तसाच असल्याने तो हटविण्याची मागणी जोर धरीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून चिकणी पूलाला असलेला झाडाझुडपांचा विळखा हटविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version