बालसुधारगृहातील मुलाला नेले पळवून

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिवली येथे असलेल्या बाल सुधारगृहातील 16 वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याची घटना घडली आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक शुक्रवारी (दि.10) पिडीत मुलगा कर्जत तालुक्यातील दहीवली येथील सुधारगृहात राहत होता. तो पीडित मुलगा मूळचा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील लक्ष्मी वसाहत येथील राहणारा आहे. दहिवली बालसुधारगृहातुन कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणास्तव फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने फुस लावुन पळवून नेले. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.243/2021 भा.दं.वि.क.363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट हे करीत आहेत.

Exit mobile version