जिल्ह्यातील बालके होणार लसवंत

1 लाख 82 हजार बालकांना देणार पोलिओ डोस
आरोग्य यंत्रणा सज्ज
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या 1 लाख 82 हजार 289 बालकांना 2 हजार 525 बूथवर पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 1 लाख 82 हजार 289 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्याकरिता ग्रामीण भागात 2 हजार 382 आणि शहरी भागात 143 असे एकूण 2 हजार 525 बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त बस डेपो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणीसुद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या कार्यक्रमासाठी 5 हजार 647 आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खासगी संस्थांचादेखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे, अशी माहिती डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओसारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे. – डॉ. किरण पाटील, सीईआ

Exit mobile version