| पनवेल | प्रतिनिधी |
नाताळ सण जवळ येताच खांदा वसाहतीतील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गातून अवतरल्याप्रमाणे सांताक्लॉजचे आगमन होताच संपूर्ण शाळा आनंदाने गजबजून गेली. सांताक्लॉजने लहान मुलांसाठी भेटवस्तू व चॉकलेट्स घेऊन नाचत-गाजत प्रवेश केला. सांताक्लॉज दिसताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांनी टाळ्यांच्या गजरात, नृत्य करत सांताक्लॉजचे उत्स्फूर्त स्वागत केले. या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण नाताळच्या उत्साहाने भारावून गेले असून विद्यार्थ्यांना आनंद, प्रेम आणि एकोप्याचा संदेश मिळाला.







