| रायगड | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा समारोप नुकतात अलिबाग येथील तारांगण रिसॉर्टमध्ये उत्साहात संपन्न झाला. उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रायगड आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगडचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, उद्योजक ज्ञानदेव खंडारे, प्राध्यापक आचार्य, दयानंद चतुर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यागार यांनी मार्गदर्शन केले. मागील 18 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला. त्यामध्ये उद्योग निवडीपासून उद्योग सुरु करण्यापर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग संधिशोध डायरेक्टर डी.के. आहुजा, इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकींगचे धोपटे, इंद्रायणी लोटणकर, राजेश कांदळगावकर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, यांनी सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण घेऊन एक नवीन ऊर्जा देण्याचे काम केले.
प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत व्यक्तिमत्त्व विकास, ध्येय निश्चिती, संभाषण कौशल्य, कच्चा माल, लघुउद्योग नोंदणी, शासकीय निमशासकीय कर्ज व अनुदान योजना, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, विविध वित्तीय महामंडळाकडून मिळणारे अनुदान, मार्केटिंग, मार्केट सर्वे, प्रकल्प अहवाल, उद्योगासाठी लागणारे व विविध परवाने, लघु उद्योगाचे कायदे, उद्योग उभारणीचे टप्पे, उद्योग व्यवस्थापन तंत्र-मंत्र, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटद्वारे करता येणारे उद्योग, आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात धोरणे, यशस्वी उद्योजकांशी संवाद असे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातील 18 दिवसांतील प्रशिक्षणाचे अनुभव, मनोगत व्यक्त करून आपला आत्मविश्वास दर्शविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापकांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग प्रशिक्षण समन्वयक मंगेश उदबत्ते, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी नितीन गायकवाड यांनी केले.