नागोठणे पोलिसांच्या कारवाईत अनेक गुन्हे दाखल
| नागोठणे | वार्ताहर |
विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस यंत्रणेकडून नागोठणे विभागात सर्वत्र करडी नजर ठेवण्यात येत आहे.
आचारसंहितेच्या काळात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून नागोठणे पोलीस यंत्रणेकडून नागोठणे शहर व विभागातील विविध प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात गुन्हे दाखल करून व अवैध धंदे बंद करून अवैध धंद्यांना चाप लावला आहे. आचारसंहितेचा एक भाग म्हणून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, अशी माहिती नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांनी दिली. नागोठणे ग्रामीण विभागातील गावांत व आदिवासी वाड्यांवरील अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून गावठी दारूची निर्मिती करणार्या भट्टी उद्ध्वस्त केल्या आहेत. तसेच गावठी दारू विक्रीचे धंदे करणार्यांविरोधात कारवाई केली आहे तसेच संबधितांवर गुन्हेही दाखल केले आहेत. त्यामुळे अवैध करणार्यांमध्ये घबराट पसरली आहे. नागोठणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.