जिल्हाधिकार्‍यांनी घेतला क्रांतीदिनाच्या तयारीचा आढावा

| अलिबाग । वार्ताहर ।

महाड हे ऐतिहासिक शहर असून सोमवार (दि.20) या ऐतिहासिक दिवशी आंबेडकर अनुयायी सामान्य जनता व लोकप्रतिनिधी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी महाड येथे येत असतात. येथे येणार्‍या अनुयायांना रेल्वे बस सेवा, पिण्याचे पाणी, सुलभ सुविधा, आरोग्य तपासणी, तात्पुरता निवारा, बस थांबा, वाहन पार्किंग व्यवस्था इ. सुविधा पुरविणे व त्यात समन्वय असणे आवश्यक आहे. याकरिता सामाजिक संघटना व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राहण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना यांची एकत्रित बैठक गुरुवार (दि.16) जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव, महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक संचालक आरोग्य डॉ.प्रताप शिंदे, गट विकास अधिकारी वाय.एस.प्रमे, तहसिलदार सुरेश काशिद, महाड पोलीस निरीक्षक एम.पी. खोक, पोलीस निरीक्षक (वाहतूक) रायगड अलिबाग सुवर्णा पत्की, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव शेडगे, प्रकाश जमदाडे, प्रकाश मोरे, दिपक पवार व राजा आदाटे, शरद मोरे, मोहन सुदाम घाडगे, दिपक पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version