परशुराम माळी यांच्या पुढाकाराने शौचालयाची बांधणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय खरवई ही आदिवासी विभागामधील शाळा आहे. विद्यालयातील मुलींसाठी व मुलांसाठी शौचालयाची मोठी गरज होती. याबाबत विद्यालयाचे किशोर सणस यांनी परशुराम माळी यांना शौचालयाबाबत विनंती केली असता परशुराम माळी यांनी त्यांचे सहकारी पवार यांच्या पुढाकाराने या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यालयास एक सुसज्ज असे शौचालय बांधून दिले आहे.
या शौचालयाचे उद्घाटन संस्थेच्या मॅनेजर दीप्ती हजारे व परशुराम माळी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संस्थेचे सुरज सर, पवार सर, सचिन बांधल विद्यालयाचे मुख्याध्यापक हिंगडे, दावभट सणस, खोपडे, घोसाळकर मॅडम, सुरवसे मॅडम, चौधरी आणि विद्यार्थी र् मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी मनोगतातून आमची शौचालयाची सर्वात मोठी समस्या दूर झाल्याने मुख्याध्यापक यांनी माळी व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
