अन मैफिल आयुष्यभर लक्षात राहिली…

बाबासाहेब हे वरकरणी शाहीर असल्याचं म्हणत असले तरी या पलीकडे जाऊन ते इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक होते. बाबासाहेबांचा वावर केवळ इतिहासकारांमध्ये, अभ्यासकांमध्ये नव्हता तर ते पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, कौसल्याबाई कोपरगावरीण आदी सर्वांमध्ये समरस होऊन वागायचे. कोपरगावच्या गंगाधर बागुल यांच्या अमृतमहोत्सवाला त्यांनी हजेरी लावली होती. बागुल यांच्या वस्तीवर त्यांनी दोन दिवस मुक्काम केला होता. ते नगर जिल्ह्यात ङ्गजाणता राजाफ हे महानाट्य घेऊन आले, त्या वेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील कदम यांच्या कुटुंबीयांची आवर्जून भेट घेतली होती. पुण्यात नगर जिल्ह्यातील निवडक लोकांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा पहिल्या तमाशा कलावंत कौसल्याबाई कोपरपगावकरीण यांची त्यांनी सुंदरशी आठवण सांगितली होती. एकदा बाबासाहेब, पुलं आणि कौसल्याबाईंची भेट झाली. त्या वेळी बाबासाहेबांनी कौसल्याबाईंना लावणीवर नृत्य करायला सांगितलं. कौसल्याबाईही हजरजबाबी! त्या म्हणाल्या, भाईंनी हार्मोनियमवर साथ दिली तर मी लावणी म्हणते आणि नृत्यही करते. भाईंनी हार्मोनियमवर साथ देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती मैफल कायमची लक्षात राहील, असं बाबासाहेबांनीच सांगितलं होतं.

Exit mobile version