विषबाधा झालेल्या सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एकच त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 257 वर गेला आहे. पूरक आहारात दिलेली सुट्टी बिस्किटे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.17) सकाळी मळमळ, उलट्या होऊ लागल्या. यातील अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यातील सात विद्यार्थ्यांवरती प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी या विद्यार्थ्यांचे प्रकृती आणखीनच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

253 विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरचा सिविल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

Exit mobile version