आगरदांडा येथील जेटीची दुरवस्था


शासनाकडे दुरुस्तीची मागणी
। मुरुड-जंजिरा ।
मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्याला समुद्र मार्गे जोडण्यासाठी अगरदांडा जंगल जेटी महत्वाचा दुवा ठरली आहे. या जंगल जेटीची समुद्राच्या लाटांच्या मार्‍याने दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी ही जेटी फुटली आहे. तरी शासनाने वेळीच लक्ष देऊन दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पूर्वी श्रीवर्धनला आलेले पर्यटक मुरुडला गाडी घेऊन यायचे. तर काहीजण 120 किमी अंतर कापून रोड मार्गे येत असत. पण 2014 साली शासनाच्या परवानगीने चंद्रकांत मोकल यांनी स्वखर्चाने जंगल जेटी बांधली आणि मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा हे तीन तालुके जलमार्गाने जोडले गेले. पर्याकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर मेरीटाईम बोर्डाने शेजारीच नूतन जेटी बांधली. परंतु ही नुतन जेटी तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याने तिचा वापर होत नाही. अगरदांडा, दिघी जंगल जेटी 2 बोटीची सेवा चालू आहे. मध्यन्तरी वादळामुळे मोकल यांनी बांधलेली जेटी लाटांच्या मार्‍यानी अनेक ठिकाणी फुटली आहे. शासन बोटधारकांकडून टॅक्स घेते, त्यामुळे तुटलेल्या जेटीची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.


हे खरं आहे कि आम्ही बांधलेली जेटी मोठ्या भरती, ओहोटीला बोट लावण्यासाठी उपयोगात येत नाही. पाण्याचा करंट जास्त असल्याने बोट लागत नाही. मोकल यांनी बांधलेली जेटी वापरली जाते. पुढली काळात मोकल जेटीचे दुरुस्तीचे प्रस्ताव करण्यात येतील व लवकरात लवकर दुरुस्त होईल.
कुलकर्णी साहेब, मेरीटाईम बोर्ड अधिकारी.

Exit mobile version