चुनाभट्टी पूल परिसरात आढळला मृतदेह

। पेण । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील चुनाभट्टी पुलाशेजारील परिसरात एका इसमाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध दादर सागरी पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 50 वर्ष इतके आहे, अंगाने मध्यम, केस काळे, चेहरा उभट असून अंगात राखाडी रंगाचे हाफ बाह्याचे टीशर्ट व पिवळ्या रंगाची पॅन्ट तसेच हातात स्टील आणि तांब्याचे दोन कडे असा या मृत इसमाचा पोशाख आहे.

या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास दादर सागरी पोलीस ठाणे, फोन 9405830709 किवा सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.डी.पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर, सहाय्यक फौजदार भुवड यांच्याशी संपर्क साधाव असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version