मोराच्या मुत्यूने बेलोशीकर हळहळले

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
जिल्हात बैलगाडी शर्यतीत सात प्रथम क्रमाकांची बक्षीसे पटकावित मालकास प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवून देणारा भोपी बंधूच्या मोरा बैलाच्या निधनाने संपुर्ण बेलोशी ग्रामस्थ व बैलगाडी शर्यत प्रेमी हळहळले.

बेलोशीचे भोपी बंधूची बैलगाडी शर्यतीत आव्हान होते, अनेक बक्षिसे बैलगाडी शर्यतीत भोपी बंधूच्या छकड्या गाडीने पटाकाविले, त्यामध्ये प्रथम क्रमांकाची सात बक्षिसे आहेत, एक आगळ वेगळं वर्चस्व बैलगाडी शर्यतीत भोपी बंधुच्या छकडया गाडीने निर्माण केले होते, यामध्ये श्रीधर भोपी यांच्या मोरा बैलाचे विशेष मेहनत व परिश्रम होते.

मालकांच्या प्रतिष्ठेसाठी व नावलौकिासाठी जीवाचे रान करून वाराचे वेगाने धावणारा मोरा बैल अनेक आठवणी ठेवून गेला, श्रीधर भोपी व कुटूंबियाचे डोळे मात्र त्याच्या आठवणीने भरून आले. मोरा बैलासारखा बैल होणे नाही, अशीच प्रतिक्रिया पंचक्रोशीत मोरा बैलाच्या निधनाने उमटली.

Exit mobile version