| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रुप ग्रामपंचायत मधील भालिवडी गावातील स्मशानभूमी शेड नादुरुस्त झाली आहे. स्थानिकांनी या स्मशानभूमी शेडची नव्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
भालिवडी गावातील बौद्ध समाजाची एकमेव स्मशानभूमी शेड आहे. या स्मशानभूमी शेडमध्ये पार्थिव ठेवण्यासाठी लोखंडी अँगल उभे केले आहेत. मात्र, तेथे पार्थिव ठेवण्यासाठी कुठला चौथारा नाही. त्याचवेळी तेथे कोणत्याही प्रकारचे पत्र्याचे शेड नाही. त्यामुळे भर पावसात पार्थिव अंत्यसंस्कार केले जातात तेथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीने लोखंडी स्टॅन्ड बनवून दिले आहेत. त्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे नव्याने प्रशस्त स्मशानभूमी व शेड बांधून देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत कृषीवलच्या प्रतिनिधींनी स्थानिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, आमच्याकडे निधी उपलब्ध नसून ग्रामपंचायतीच्या प्रशासकांना ग्रामस्थांच्या मागणिबाबत कळविले आहे. असे सांगितले.







