अमर वार्डे यांचेविधानसभा अध्यक्षांना अनावृत्त पत्र
। रायगड । प्रतिनिधी ।
सलोख्याच्या वातावरणात राहणार्या अलिबाग तालुक्यात नामांतराचे बीज पेरण्याचे क्षमा न करण्यासारखे अलौकिक आणि ऐतिहासिक कार्य करीत आहात. त्यापेक्षा आपल्या पदाचा वापर अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी करावा असा उपरोधिक चिमटा घेणारे अनावृत्त पत्र अलिबाग नगरीचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना लिहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात धुरा बजावणारे आपण विधानसभेच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये अध्यक्ष झाला आहात . राष्ट्रवादीचे निष्ठावंत असणारे आपण आता भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत झाल्याचे समजते. महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या उलथापालथी सर्वोच्च न्यायालयात पोहचल्या. त्यावेळी तुमच्या ज्ञानाची प्रचंड चर्चा झाली. यानिमित्ताने बाळासाहेब भारदे, वि.स.पागे, बॅ. शेषराव वानखेडे, जयंतराव टिळक आदी तत्कालीन विधानसभा अध्यक्षांची आठवण झाली. असे अमर वार्डे यांनी पत्रात नमूद केले आहे.
अलिबाग तालुक्याच्या विकासात 1977-78 थळ प्रकल्प , रेवस मांडवा परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ , 1972 ते 1978 मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला सांबर कुंड मध्यम प्रकल्प, गाळाने भरलेलेउमाटे धरण, निसर्ग वादळाचा तडाखा, बहुचर्चित विरार अलिबाग कॉरिडोर, खारेपाटातील शेतकर्यांच्या समस्या आदी अनेक विकासाचे मुद्दे अलिबाग तालुक्यात प्रलंबित आहेत. या मुद्दयांवर बोलणे दूर आपण थेट अलिबाग तालुक्याच्या नामांतरासाठी पुढाकार घेतला आहात. त्यापेक्षा अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा परिसरात अनेक भूखंड विकसित करणे आणि विक्री करणे सुरु आहे. या विकसन प्रक्रियेत आपले नावअग्रक्रमाने घेतले जात असल्याची चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे. तसेअसेलतरभूखंडाचे श्रीखंड महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजले आहेत. विकसित होणार्या या परिसराला आणि नगराला आपण मुख्यमंत्र्यांकडे अलिबागच्या नामांतरासाठी मागणी केलेले नाव द्यावे असे अमर वार्डे यांनी राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.