। मुंबई । वृत्तसंस्था ।
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझ्या संगीत क्षेत्रातील कामाची सुरुवातच मुळात लतादिदींबरोबर, त्यांच्या आशीर्वादाने झाली. माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला सोन्याची गणपतीची मूर्ती दिली होती. या मूर्तीच्या रूपाने माझ्या डोक्यावर त्यांचा हात कायम असणार आहे. दिदींशी माझे नियमित फोनवर बोलणे व्हायचे. अलीकडे आम्ही व्हाट्सअपवरून जास्त संवाद साधायचो. त्यांना मोबाइल तंत्रज्ञानाची बरीच माहिती होती. माझी काही गाणी पाठवली की भरभरून कौतुक करायच्या. त्यांच्याशी होणारा हा संवाद आता शक्य नाही. पण त्यांच्या गाण्यातून, आठवणीतून हा संवाद अविरत सुरू राहील. – शंकर महादेवन, प्रसिद्ध गायक