पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गोगावले भावकीतील वाद मिटला

महाड येथील लोकन्यायालयात 77 फौजदारी, 12 दिवाणी प्रकरणे निकाली

। महाड । प्रतिनिधी ।

महाड येथे शनिवारी (दि.11) आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये 77 फौजदारी आणि 12 दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गोगावले भावकी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला वादही या महा लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आला.

महाड न्यायालयात या महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महाड कामगार न्यायायलाचे वरिष्ठ स्तर न्यायाधिश उन्हाळे आणि महाडचे दिवाणी न्यायाधिश शेख यांनी याचे काम पाहिले. सन 2018 पासून पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गावातील गोगावले भावकी यांच्यामध्ये गावातील स्मशानभूमीवरुन वाद सुरु होता. न्या.उन्हाळे यांनी दोन्ही बाजूंशी समन्वय साधून या लोक अदालतीमध्ये हा वाद संपुष्टात आणला. यामुळे दोन्ही बाजूंकडून आभार व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version