डॉलरला उभारी, पैसा मात्र घसरला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय चलनाची मोठी पडझड झाली आहे. सोमवारच्या सुरूवातीच्या सत्रात भारतीय चलन 52 पैशांनी घसरून तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत 77.42 वर पोहोचली आहे. ही आत्तापर्यंतची भारतीय चलनाची सर्वांत मोठी घसरण आहे. परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.17 वर उघडला होता आणि नंतर 77.42 पर्यंत घसरला, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 52 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 55 पैशांनी घसरून 76.90 वर बंद झाला.

Exit mobile version