| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण-मध्य मुंबईतील खेळ महोत्सव 2025 च्या तिसऱ्या पर्वात खो-खो स्पर्धेतील रोमांचक आणि अटीतटीच्या लढतींनी उपस्थितांची मने जिंकली. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या खेळ महोत्सवात मुलांच्या खो खो स्पर्धेत श्री समर्थ व्यायाम मंदिरने विद्यार्थी स्पोर्ट्स क्लबवर मात करत आपला दबदबा कायम ठेवला.
मुलींच्या खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पोर्टर्स क्लब संघावर मात करून श्री समर्थ व्यायाम मंदिरने विजयावर शिक्कामोर्तब केले. खो-खोत महिला व पुरुष गटात प्रत्येकी 8-8 संघांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान, रस्सीखेच स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात भावना ट्रस्ट कॉलेज (चेंबूर), एल. वी. ए. स्पूल, भावना ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब या तिन्ही संघांनी उत्पृष्ट कामगिरी करत विजयश्री खेचून आणली. वरिष्ठ महिला गटात अकि गर्ल्स, एकलव्य आणि तेरणा कॉलेज या संघांनी विरोधी संघांवर विजय मिळवला. तर वरिष्ठ पुरुष गटात एकलव्य, ब्लॅक पँथर आणि सिद्धिविनायक ग्रुप या संघांनी दमदार खेळ करत प्रथम स्थान पटकावले. विजयी संघांना दिवाकर रावते, महेश सावंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी संदीप देशपांडे, संतोष धुरी, विशाखा राऊत, साईनाथ दुर्गे, राजू पाटणकर, सिद्धार्थ चव्हाण, श्रद्धा जाधव, अजित कदम, वैशाली कोपडे, सिद्धार्थ चव्हाण, श्रद्धा जाधव, वैशाली पाटणकर, मयूर कांबळे, देवा कांबळे, प्रवीण नरे, दिनेश बोभाटे, संजय भगत, प्रथमेश बोभाटे उपस्थित होते.







