उघडले जाणार स्टेडियमचे दरवाजे

आयपीएलसाठी 50 टक्के प्रवेशास परवानगी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल-14चा दुसरा टप्पा रविवारपासून यूएईत सुरू होत आहे. या टी-20 लीगदरम्यान प्रेक्षकांना मर्यादित संख्येत मैदानात प्रवेश देण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आयपीएलचे आयोजन मे महिन्यात बायोबबलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळताच स्थगित करण्यात आले होते.
रविवारी पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होईल. आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, मपहिला सामना अविस्मरणीय क्षण असेल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही महिन्यांनंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीचे आम्ही स्वागत करणार आहोत. सर्व सामने दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे होणार असून कोरोना प्रोटोकॉल तसेच यूएई सरकारचे दिशानिर्देश पाळून प्रेक्षकांसाठी मर्यादित आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. 2019 नंतर प्रथमच आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांच्या साक्षीने होईल. 16 सप्टेंबरपासून तिकीट विक्री सुरू होत आहे. तिकीट प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

Exit mobile version