। मुंबई । प्रतिनिधी ।
शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारी (7 ऑक्टोबर) प्रारंभ होत आहे.या निमित्ताने गेले दीड वर्ष बंद ठेवण्यात आलेली सर्व धर्मियांच्या मंदिरे,चर्च,मशिदीचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठी उघडले जाणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने सर्व मंदिरांसह मशिदी,चर्चेस दीड वर्षापासून सर्वसामान्यांसाठी बंद ठेवली होती.पण गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने सरकारने ही धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.तो घेताना सर्वच प्रार्थना स्थळांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.शिवाय अनेक मंदिरांमध्ये ऑनलाईन पासची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.त्यामुळे भक्तांना आता ऑनलाईन बुकीग करुनच मगच मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे.
10 वर्षाखालील मुले,65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,गर्भवती,आजारी यांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.दरम्यान,मंदिरे सुरु होत असल्याने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.