हक्काच्या घराचे स्वप्न साकार

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेची सोडत
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 करिता घरांची सोडत शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी सिडको भवन येथील सभागृहात पार पडली. माजी लोकायुक्त सुरेश कुमार व माजी (डखजचक) मोईझ हुसेन यांच्या देखरेखीखाली ही संगणकीय सोडत काढण्यात आली. नवी मुंबईसारख्या सोयीसुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने या यशस्वी अर्जदारांनी आनंद व्यक्त केला.

सिडकोतर्फे 24 ऑक्टोबर 2022 रोजी ही महागृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. या योजनेतून नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये परवडणार्‍या दरातील 7,849 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिडकोतर्फे साकारण्यात आलेली ही आत्तापर्यंतची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची सर्वात मोठी योजना होती. नागरिकांतर्फे या योजनेस अभूतपूर्व मिळाला.

सिडको महामंडळातर्फे परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये या परवडणार्‍या दरातील 7,849 सदनिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उलवे नोड हा वेगाने विकसित होणारा व परिवहनदृष्ट्या समृद्ध नोड आहे. या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर स्थानकांसह महामार्ग, आगामी एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणार्‍या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून घेतले जाते.

महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमध्ये यशस्वी ठरलेलल्या अर्जदारांचे अभिनंदन. – संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Exit mobile version