स्वदेस फाऊंडेशनचा मदतीचा हात; मिळणार भरघोस शिष्यवृत्ती
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील गुणवंत परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला बळ देण्यासाठी रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वदेस शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. यामुळे डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील बनण्याचे ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आणि सुधागड या तालुक्यांमध्ये गाव विकास समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे कार्य सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आतापर्यंत 1061 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीच्या जोरावर आपले उच्च शिक्षण पूर्ण करून नामांकित क्षेत्रात नोकरी मिळवली आहे.
शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर आणि सुधागड येथील रहिवासी असावा. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाख रुपयांच्या आत असावे. 12 वी (कला, वाणिज्य, विज्ञान) मध्ये स्वदेस कार्यक्षेत्रातील गावातील विद्यार्थ्यांना 60%, तर इतर गावांतील विद्यार्थ्यांना 70% गुण अनिवार्य आहे.
या कोर्सेससाठी मिळणार आर्थिक साहाय्य
12 वी नंतर पुढील क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. वैद्यकीय क्षेत्र: चइइड, इअचड, इऊड, इझढ, नर्सिंग, फार्मसी. अभियांत्रिकी: पदवी, पदविका आणि आर्किटेक्चर. वाणिज्य व विधी: उअ, उड, इ.उेा (अलर्लेीपींरपलू), ङङइ, ङङच. इतर: हॉटेल मॅनेजमेंट आणि फॅशन डिझायनिंग.
अर्ज प्रक्रिया आणि निवड
स्वदेस फाउंडेशनने दिलेल्या कोड स्कॅन करून 5 मे 2026 पूर्वी ऑनलाईन माहिती भरावी. अर्जांची छाननी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन मुलाखती घेतल्या जातील. त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याची शैक्षणिक फी आणि वसतिगृहाचा खर्च लक्षात घेऊन शिष्यवृत्तीची रक्कम थेट दिली जाईल.
अधिक माहितीसाठी स्वदेस फाऊंडेशनचे विनोद पाटील (9272006743) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभाग प्रमुख रंजीश कट्टाडी यांनी केले आहे.
