| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि.3) सकाळी एका आयसर टेम्पोने धुक्यात समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन आयसर टेम्पो क्रमांक (डीडी 01 आर 9953) मुंबईहून पुण्याकडे माल घेऊन जात असताना महामार्गावर पहाटे मोठ्या प्रमाणात धुके असल्याने टेम्पो चालकाला समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात टेम्पोच्या केबिनमध्ये चालक अडकून तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स व देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पोमध्ये अडकेलेल्या चालकाला बाहेर काढून अपघातग्रस्त टेम्पो बाजूला घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.
टेम्पोचा भीषण अपघात; चालक जागीच ठार
