चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे वाचले प्राण

मुरूड । वार्ताहर ।
पहिल्या रोहा भालगाव मुरुड एसटीला सकाळी मोठा अपघात होता होता टळला. एसटी चालक अश्फाक जमादारच्या सतर्कतेमुळे वाचले 20 प्रवाशांचे प्राण प्रवाशांनीही अनुभवला हा थरार प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. दि. 15 जून रोजी सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी रोहा भालगावलगाव मुरुड एसटी नेहमीप्रमाणे स्थानकातून सुटली. वाटेतील सर्व एसटी थांबे घेत घेत ही एसटी काढणे बुद्रुक नजीक येत असताना समोरून भरधाव पिकप वाहन येत होते. ही बाब एसटी चालक जमादार यांच्या लक्षात आली. रस्ता अरुंद असल्याकारणाने प्रसंगावधान राखून एसटी चालकाने एसटी पूर्णपणे रस्त्याच्या साईटपट्टीवर उतरवली. समोरून येणार्‍या पिकप वाहन चालकाने ब्रेक मारले असता पिकप वाहन घसरून मागील बाजू एसटीवर आदलळी त्यामुळे होता होता मोठा अपघात टळला आहे.

Exit mobile version