इजिप्तच्या कुस्तीपटूला पोलिसांनी केली अटक

महिलेचा विनयभंग करणे पडले महागात

| पॅरिस | वृत्‍तसंस्था |

इजिप्तच्या कुस्तीपटूला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय मोहम्मद अलसयदची पोलिस चौकशी केली जात आहे. पॅरिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पहाटे पाचच्या सुमारास अटक करण्यात आली. डिस्ट्रिक्ट कॅफेसमोरून त्याला ताब्यात घेण्यात आले. इजिप्तच्या स्टार खेळाडूने बारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

घटनेच्या वेळी खेळाडू दारूच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे. ऑलिम्पिकमध्ये ड्रग्जच्या प्रभावाखाली खेळाडूंनी गोंधळ घातल्याची प्रकरणे यापूर्वीच समोर आली आहेत. मोहम्मदने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 67 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. जो या ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या सामन्यात अझरबैजानच्या हसरत जाफारोवकडून हरला आणि पदक जिंकण्यात अयशस्वी ठरला. सध्या या खेळाडूची सुटका झाली आहे की तो पोलिसांच्या ताब्यात आहे, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत.

Exit mobile version