। मुंबई । वृत्तसंस्था ।
प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम 22 डिसेंबरपासून बेंगळूरुत सुरू होणार असून, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांशिवाय हे सामने होणार आहेत. मुंबईत 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कबड्डीपटूंचा लिलाव झाल्यानंतर संयोजक मशाल स्पोर्ट्सने आठवा हंगाम एकाच ठिकाणी म्हणजे बेंगळूरुत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही प्रो कबड्डीसंदर्भातील निर्णयाचे स्वागत केले आहे.
खेळाडू स्पर्धेशी निगडित व्यक्तींच्या सुरक्षेला महत्त्व देत करोनाविषयक सरकारी मार्गदर्शक तत्त्वांआधारे बेंगळूरु या एकाच शहरात जैव-सुरक्षित वातावरणात प्रो कबड्डी लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. -अनुपम गोस्वामी, प्रो कबड्डी लीगचे समन्वयक