वाडगावमध्ये प्रचाराचा शुभारंभ

प्रविणा घासे, प्रफुल्ल पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा झंझावात सुरु आहे. चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रविणा प्रमोद घासे आणि आक्षी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल कृष्णा पाटील यांनी वाडगाव येथे प्रचाराला सुरुवात केली. श्री पटकादेवीचे दर्शन घेऊन नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आरती पाटील, अरुण पाटील, मधुकर थळे, दिपक गुरव, सुशील घासे, रवि पाटील, मारूती सुरवसे, नामदेव पाटील, ॲड. प्रसाद पाटील, कल्पना वेळे, पूर्णिमा वेळे, संजीवनी गोळे, सुजीत ठाकरे, जितेंद्र मढवी, प्रवीण बांदीवडेकर, सुनील वेंगुर्लेकर, अनंत मुळूसकर, उदय वेळे, निलेश पेडणेकर, नरेश कोळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रचाराच्या सुरुवातीला वाडगाव फाटा येथील श्री पटकादेवीचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. वाडगाव येथील मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक देऊन खटारा चिन्हा समोरील बटण दाबून मतदान करण्यात आले. प्रचाराच्या दरम्यान एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत घरोघरी प्रचार करण्यात आला. प्रविणा घासे आणि प्रफुल्ल पाटील यांंचे मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मतदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा विजय निश्चित असल्याचा विश्वास येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version