। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील वीजग्राहकांची थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयातून 500 रुपयांपेक्षा जास्त वीजबिलाची थकबाकी असणारे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कडक निर्देश सर्व परिमंडलांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्यात सोयीसाठी तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी भांडूप परिमंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.
भांडूप परिमंडलात वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. याशिवाय तात्पुरता खंडित केलेल्या वीज जोडणीची तपासणी केली जात आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी भांडूप परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सुरु राहणार आहेत असे सांगण्यात आले आहे.