अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुकीं करून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार कळंबोली वसाहतीत घडला आहे. जीवन भोईर असे धाक्काबुक्की करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, बेकायदेशीर रित्या रस्त्यावर व्यवसाय करत असलेल्या एका महिलेने अतिक्रमण हटवण्यास सांगितल्याच्या रागातून भोईर यांना शिवीगाळ करत धक्का बुक्की केली आहे. यावेळी कर्मचाऱ्याची कॉलर पकडून पालिकेचे ओळखपत्र तोडण्यात आल्याने या महिलेविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version